
मंगलमूर्ती फाउंडेशन पालीचा सामाजिक उपक्रम, ग्रामस्थांकडून कौतुक
संतोष कोत्रे l लांजा –: गेल्या चार वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंगलमूर्ती फाउंडेशन पाली या संस्थेच्या वतीने तालुक्याच्या दुर्गम भागात वसलेल्या माचाळ येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट तसेच ग्रामस्थांना रेनकोट आणि केशर जातीच्या आंब्याच्या कलमांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाचे माचाळ ग्रामस्थ, पालक वर्गातून कौतुक होत आहे
ज्या समाजात आपण राहतो, वावरतो त्या समाजाप्रती आपण काही देणे लागतो. या उदात्त हेतूने सन २०२१ रोजी स्थापन झालेल्या मंगलमूर्ती फाउंडेशन पाली( जिल्हा रत्नागिरी) या संस्थेमार्फत गेल्या चार वर्षांपासून सातत्याने सामाजिक ,शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश गणपत पाखरे, उपाध्यक्ष सौ ज्योती जयप्रकाश पाखरे आणि सचिव सौ. वैदेही धनंजय वणजु हे सामाजिक दायितच्या भावनेतून काम करत आहेत.मंगलमूर्ती फाऊंडेशन च्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वाटप, मोफत रूग्णवाहिका लोकार्पण असे उपक्रम यापूर्वी राबविण्यात आलेले आहेत.
संस्थेच्या वतीने यावेळी आज लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या आणि तालुक्याच्या दुर्गम भागात वसलेल्या माचाळ या गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्यासाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज संस्थेच्या वतीने माचाळ येथे जाऊन शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे येथील ग्रामस्थांना देखील मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांना केशर या आंबा कलमांचे देखील वाटप करण्यात आले. संस्थेच्या सचिव वैदेही वणजु यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माचाळ या ठिकाणी मुलांना रेनकोट आणि ग्रामस्थांना केशर आंबा कलम वाटप करण्यात आले .
अशाप्रकारे सामाजिक, शैक्षणिक दायित्वाच्या भावनेतून करण्यात आलेल्या रेनकोट वाटप आणि आंबा कलम वाटप उपक्रमाबद्दल मंगलमूर्ती फाउंडेशन या संस्थेचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले. आमच्यासारख्या ग्रामीण भागात येऊन आपण विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना केलेली मदत ही नेहमीच आमच्या इठवणीत राहील असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.













