हरिचरणगिरी महाराजांचा ८ जुलैला पुण्यतिथी उत्सव.

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ले l प्रतिनिधी :हरिचरणगिरी येथील मठात श्री हरिचरणगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मंगळवार ८ जुलै रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण दिवस-रात्र विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री हरिचरणगिरी महाराज वार्षिक पुण्यतिथी उत्सवास मंगळवार ८ जुलै रोजी सकाळी ७ मठातील सर्व समाधी पूजनाने सुरुवात होईल त्यानंतर पवमान- लघुरुद्राभिषेक,दुपारी १२ वाजता नैवेद्य ,महाआरती ,दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ४:३० ते ५:३० स्वरसंगीत प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी-कोंडूरा यांचे भजन , सायंकाळी ५ :३० ते ६:३०स्वरबंदीश भजन मंडळ वेंगुर्ला यांचे भजन,६:३० ते ७:३० सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ खानोली यांचे भजन,७:३० ते ८:३० पुराण व धुपारती रात्रौ ९ ते १२ ह.भ.प.प्रभंजन भगत (शिर्डी)यांचे कीर्तन,रात्रौ १२ ते ३ हरिचरणगिरी प्रासादिक भजन मंडळ आणि हौशी कलाकार यांची भजन सेवा, रात्रौ ३ ते ५ ह.भ.प मकरंद देसाई (केळुस) यांचे कीर्तन पहाटे ५ वाजता श्री रत्नाकर प्रभू आणि सहकारी (कोचरा) यांच्या लळीताच्या कार्यक्रमाने या वार्षिक पुण्यतिथी उत्सवाची सांगता होणार आहे.या उत्सवास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतात.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त श्रीमठ हरिचरणगिरी ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.