पालक मेळाव्यात सायबर मार्गदर्शन व समित्यांची पुनर्रचना
शिरगाव (प्रतिनिधी) –देवगड तालुक्यातील पेंढरी ग्रामविकास मंडळ संचालित पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात मार्च २०२५ मधील शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रोख रक्कम व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. हे बक्षिस विद्यालयाचे माजी शिक्षक श्री. सूर्यकांत साळुंखे, श्री. दिगंबर मुणगेकर, सेवानिवृत्त शिक्षक श्री. गणेश हुले, व सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. अभय सावंत यांनी ठेवलेल्या कायमस्वरूपी ठेवींवरील व्याजातून देण्यात आले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. मिलिंद सोमले (मालक, सोमले कॅशू), श्री. नितीन वर्णे (शाखा व्यवस्थापक, सिंधुदुर्ग बँक – फणसगाव), ग्रामपंचायत सरपंच श्री. मंगेश आरेकर व श्री. दिनेश मेस्त्री यांनीही आर्थिक सहकार्य केले.
यानंतर शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी पालक मेळाव्यात शाळेतील विभागीय समित्यांची पुनर्रचना करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या औचित्याने इंडस टॉवरच्या ‘जनसाक्षरता व सामुदायिक जागरूकता’ उपक्रमांतर्गत श्री. अविनाश पाटील व सायली मुंज यांनी उपस्थित पालकांना सायबर सुरक्षेबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. व संस्थेच्या वतीने उपस्थिताना बिस्किटाचे पुढे खाऊ म्हणून वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रूपेश बांदेकर, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सत्यपाल लाडगावकर, तर आभार प्रदर्शन श्री. गणेश ढेकळे यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी गावातील मान्यवर नागरिक पालक तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते












