खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील देवघर गावी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने गाईवर हल्ला केल्याने गाय जबर जखमी झाली आहे.
देवघर निवाची वाडी येथील शेतकरी श्री पंढरीनाथ मोरे आपल्या गायरानामध्ये गाई चारण्यासाठी गेले असता दुपारी ३ वाजताच्या दरम्यान झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने गाईवर प्राणघातक हल्ला केला
शेतकर्याने आरडा ओरड केल्याने गाईला वाचविण्यात यश आले. हल्ल्यात गाय जखमी झाली आहे. यामुळे वाघाची देवघर गावाव दहशत पसरलीअसून वाघाचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.












