विनय मुकादम व निवळी ग्रामस्थ कोकजेवठार यांच्या पाठपुराव्याला यश
रत्नागिरी :
रत्नागिरी, निवळी, बावनदी, मालपवाडी गाडी सुरु करण्यासाठी ग्रामस्थांनी विनंती केली होती. बावनदी कोकजेवठार निवळी फाट्या ह्या दरम्यान प्रवाशी नोकरी व कॉलेज साठी मुले, शाळेसाठी जाणेसाठी प्रवाशांची वर्दळ भरपुर असून येणा-या चिपळूण-देवरुख गाड्या फुल येत असून आमच्या स्टॉपला थांबत नाहीत व शाळेतील व कॉलेजच्या मुलांचे व नोकर वर्गाचे खुप नुकसान व त्रास होतो व निवळी मालपवाडी गाडी कित्येक दिवस बंद असुन ती गाडी पण चालू करण्यात यावी व प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल कारण चिपळुण व देवरुख गाडीवर भरवसा ठेवून नुकसान आमचे होते आहे. वरील विषयास अनुसरुन सकाळी मालपवाडी व बावनदी अश्या दोन फे-या आणि संध्याकाळी दोन फे-या द्याव्यात. कारण कमीत कमी दोनशे ते दोनशे पन्नास प्रवासी या स्टॉपवर असतात आणि जयगड, देवरुख, चिपळूण येथून येणा-या आणि जाणा-या बसेस भरुन येतात. परिणामी या स्टॉपवर म्हणजे बावनदी, कोकजेवठार, निवळी फाटा येथे बस थांबत नाहीत. शाळा कॉलेज, कामगार वर्ग सर्वांचे हाल होतात. तेव्हा सकाळी ७.०० वाजता बावनदी आणि सकाळी ७.३० वाजता निवळी मालपवाडी तसेच संध्याकाळी ६.०० वाजता बावनदी आणि ६.१५ मिनिटांने मालपवाडी फेरी सोडावी ही विनंती केली होती. त्या विषयाची गांभीर्याने दखल घेवून वहातुक नियंत्रक – श्री. किरण वसंत मुळ्ये व सहाय्यक वहातुक नियंत्रक श्री. समीर रमेश काळे यांनी दखल घेतली. यांचे ग्रामस्थाच्या वतीने आभार -मानण्यात येत आहे. असेच त्यांनी सहकार्य करून निवळी मालपवाडी गाडीची फेरी अधेमध्ये चालु असते ती सुरळीत चालू करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे.










