मीठमुंबरी येथे राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी उत्साहात
शिरगांव (प्रतिनिधी) – ‘राष्ट्रीय कृषी दिना’निमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मिठमुंबरी क्र. १ यांच्यातर्फे वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. “एक मूल – एक झाड”, “झाडे लावा, जीवन वाचवा”, “एक पेड़ माँ के नाम – हरियाली का हो पैगाम” अशा घोषवाक्यांनी दिंडी गगनभेदी झाली.
हि वृक्षदिंडी संपूर्ण मिठमुंबरी गावात फिरून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपणाचे महत्त्व आणि शाश्वत शेतीविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी बुलंद घोषवाक्यांमधून गावकऱ्यांमध्ये हरित संदेश पोचवला. गावकऱ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या वृक्ष दिंडीत या गावाचे सरपंच श्री. बाळकृष्ण गावकर, उपसरपंच श्री. गुरुनाथ गावकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मधुसूदन घोडे, शिक्षक श्री. सांळुके व श्री. सचिन धुरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हेमंत तोडणकर, उपाध्यक्षा सौ. शिल्पा गावकर, समिती सदस्य, अंगणवाडी सेविका कु. सखुबाई गावकर, कु. रविना मुंबरकर, मदतनीस कु. रक्षिता गावकर तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, सामाजिक जाणीव आणि कृषीप्रती आदर वाढीस लागला.
फोटो कॅप्शन :मिठ्मुंबरी येथे काढण्यात आलेल्या वृक्षदिंडी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.










