Dr. Lalita Gajmal’s Punyashlok Ahilya Devi Holkar Mahila Samman Award
चिपळूण | वार्ताहर : तालुक्यातील नागावे ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या डॉ. ललिता शामकांत गजमल यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दिनांक 31 मे रोजी ग्रामपंचायत नागावे येथे महाराष्ट्र शासन व महिला बालविकास विभाग यांच्याकडील आदेशानुसार ग्रामपंचायत नागावे येथे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक सेविका, ग्रामसेवक, कर्मचारी, बचत गटाच्या महिला,आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. होता या सोहळ्याचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रगती पत्रक, व रोख पाचशे रुपये असे होते. यावेळी डॉ. ललिता शामकांत गजमल पिळणकर यांना अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौविण्यात करण्यात आले. त्यांच नागावे ग्रामस्थ, कुणबी समाजोन्नती संघ शाखा मुंबई व ग्रामीण चिपळूण, कुणबी युवा चिपळूण, कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण, या सर्वांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.











