रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील एका हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना 28 जून रोजी दुपारी 2 ते 1 जुलै 2025 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत महेंद्र पंढरीनाथ नागवेकर (56,रा.नागवेकरवाडी सोमेश्वर,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,28 जून रोजी त्यांनी आपली हिरो होंडा पॅशन (एमएच-08-एस-0151) रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील हॉटेल गिरीरत्न समोर पार्क केली होती. ती अज्ञाताने लांबवली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












