रघुवीर घाटात दरड कोसळली, वाहतूक सुरळीत

खेड(प्रतिनिधी)

रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणार्‍या रघुवीर घाटात यावर्षी पहिल्यांदा या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. परंतु ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना समजताच ती दरड सकाळी साडेसहा वाजता हटवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कांदाटी खोऱ्यातील आकल्पे येथे वस्तीला असलेली बस सकाळी खेड सह खोपी येथील शाळेचे विद्यार्थी आणि प्रवासी घेऊन सुरळीतपणे आली.

दरवर्षी पावसाळ्यात रघुवीर घाटात दरड कोसळते त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील २१ गावांचा संपर्क तुटतो. परंतु यावर्षी बांधकाम विभाग तालुक्यातील अनेक दरड ग्रस्त भागावर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने लक्ष ठेवून आहे. दरम्यान बांधकाम विभागाच्या सतर्कतेमुळे रघुवीर घाटात सोमवारी रात्री दरड कोसळून देखील वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली.