उधना-मंगळूर स्पेशलला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

खेड(प्रतिनिधी)

कोकण मार्गावर धावणाऱ्या उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार स्पेशल २८ सप्टेंबरपर्यंत दर बुधवार आणि रविवारी तर परतीच्या प्रवासात वसईमार्गे धावेल.

शिमगोत्सवापासून उधना मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशल कोकण मार्गावर धावत आहे. प्रवाशांच्या मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर उन्हाळी सुट्टीसाठी स्पेशलच्या फेऱ्या चालवण्यात आल्या. २९ जूनच्या फेरीनंतर स्पेशल यार्डात विसावणार होती. २ जुलै ते २८ सप्टेंबर तर परतीच्या प्रवासात ३ जुलै ते २९ सप्टेंबर या कालावधीत स्पेशलच्या फेऱ्या धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

स्पेशल वसईमार्गे धावणार असल्याने पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांची गावी येण्याची गैरसोय याद्वारे दूर होणार आहे.

‘वास्को द गामा-मुजफ्फरपूर च्या फेऱ्यांनाही मुदतवाढ

कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टी हंगामासाठी चालवलेल्या वास् द गामा-मुजफ्फरपूर साप्ताहिक स्पेशलच्या फेऱ्यांनाही प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभला. वास्को द गामा-मुजफ्फरपूर स्पेशलच्या फेऱ्या २५ ऑगस्टपर्यंत धावणार आहेत. दर सोमवारी तर परतीच्या प्रवासात दर गुरूवारी धावेल.