“साहित्याचे वाचन ही जीवनाची संजीवनी ” प्रा.सुनिल जोपळे

रत्नागिरी दि .२ जुलै २०२५ रोजी मराठा मंदिर ,विद्या वर्धीनि स. रा. देसाई डी .एल .एड., कॉलेज रत्नागिरीच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून हिंदी विषयाच्या प्रात्यक्षिकाचा एक भाग म्हणून क्षेत्र भेट म्हणून. हिंदी विषयाचे उपक्रमशील प्राध्यापक सुनिल जोपळे यानी हिंदी साहित्य/दर्शन व्हावे या हेतूने जिल्हा शासकीय संथालय कुवारबाव येथे भेट दिली ग्रंथालयात जवळ जवळ हिंदी मराठी, इंग्रजी, विषयाचे साहित्य उपलब्धआहे. स्पर्धा परीक्षा बालसाहित्य, दालने व अभ्यासिका सुसज्ज आहे. ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल श्री. नाईक , ग्रामिण शासकीय वा अशासकीय ग्रंथालय निरीक्षक श्री काळोखे सर .तसेच मुख्य लिपीक श्री. वाघ सर, तसेच कंत्राटी कर्मचारी शिगवण मॅडम व श्री. आमरे ग्रंथ देवेघेव करणारे उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय
निरीक्षक काळोखे सर यांनी विद्यार्थ्याना वाचनाचे महत्व व ग्रंथालयाची संपूर्ण माहिती सांगितली. मुख्य लिपीक मा.श्री. वाघ सर यानी संपूर्ण संथालयाची व साहित्याच्ची माहिती सांगितली कोणत्या कपाटात कोणते साहित्य आहे याची माहिती सांगितली मुलानी हिंदी विषयाची विविध पुस्तके बघितली चाळली .सर्व विषयाचे संदर्भसाहित्य पाहून सर्व विद्यार्थी प्रभावित झाले .उपन्यास, कथा संग्रह पत्रलेखन, रेखाचित ,कथा, कादंबरी, कविता संग्रह पर हिंदी हिश्नरी न इतर साहित्याची एक तास माहिती दिली

विद्यार्थ्यानी हिंदी साहित्याचे वाचन केले. अनेक प्रश्न विचारले मार्गदर्शक प्राध्यापक सुनिल जोपळे यानी मार्गदर्शन करतान “वाचन हा विकासाचा पासवर्ड आहे”
“अंधकार है वहाँ ,जहाँ आदित्य नहीं है।
मुर्दा है, वह देश, जहाँ साहित्य नहीं |
वाचन ही साधना आहे.”
एक पुस्तक, एक पेन,
एक कलम आणि एक एक शिक्षक जग बदलू शकतात असे गौरउद्‌गार कढले. अशी एक अवीस्मणीय , अभूतपूर्व क्षेत्रभेट ठरली.