चिपळूणमध्ये ‘आषाढ वारी’ कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : चैतन्य आर्ट्स चिपळूण (रजि.) या संस्थेच्या वतीने येत्या रविवार दि. ६ जुलै रोजी देवशयनी एकादशीनिमित्त ‘आषाढ वारी’ (वर्ष २रे) या विशेष भक्तिसंगीत व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे.
या कार्यक्रमात सुमधुर भक्तिगीतांचा आनंद रसिकांना घेता येणार असून, त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. संगीत, कला आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवर कलाकारांचा व समाजसेवकांचा यावेळी गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. चैतन्य आर्ट्स चिपळूणच्या या उपक्रमामुळे चिपळूणच्या सांस्कृतिक वातावरणात भक्ती, कला आणि सन्मानाचा संगम घडणार आहे.