खेड (प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावरील तालुक्यातील मौजे धामणदेवी मधलीवाडी येथील धामणदेवीमधून वाढलेल्या गवतामध्ये अंदाजे ३५ वर्ष वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह . २ जुलै २०२५ रोजी रात्री १ च्या सुमारास आढळून आला आहे.
याबाबतची खबर पोलीस पाटील संजय पांडुरंग बहुतुले (वय-५४ वर्षे, रा. धामणदेवी गवळीवाडी, ता. खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली आहे. आढळून आलेल्या अनोळखी पुरुष मृतदेहाच्या पॅन्टीच्या खिशामध्ये माणगांव ते रत्नागिरी असे ५० रुपयाचे रेल्वे तिकीट मिळून आल्याने हा अनोळखी पुरुष माणगांव ते रत्नागिरी असा प्रवास करीत असताना रेल्वेमधून पडून त्याच्या दोन्ही पायांना गंभीर स्वरुपाच्या दुखापतीमुळे तो जागीच मयत झालेला मिळून आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.












