गुहागर l प्रतिनिधी : महात्मा फुले यांनी ३ जुलै १८५२ रोजी बहुजनांसाठी पुण्यात शाळा स्थापन करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.त्यांच्यामुळे आज सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली झाली व प्रगतीची संधी मिळाली असे प्रतिपादन . मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठी शाळेमध्ये आयोजित ऐतिहासिक दिनानिमित्त केले .
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी जानवी हरचकर ,शिक्षक वृंद अंजली मुद्दम वार ,धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, विद्यार्थी प्रतिनिधी अनिश पालशेतकर, आरोही रोहीलकर तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी , जानवी हरचकर यांचा पुष्पगुच्छ देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.धन्वंतरी मोरे, अफसाना मुल्ला, सुषमा गायकवाड, अंजली मुद्दमवार, अनेक विद्यार्थी यांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती दिली.शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका धन्वंतरी मोरे वाढदिवस अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.त्यावेळी शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले











