स्वराज मुकनाकचे मंथन परीक्षेत यश 

रत्नागिरी जिल्ह्यात पटकावला पाचवा क्रमांक

तळवली l वार्ताहर :मंथन सामान्य ज्ञान परीक्षा सन 2024- 25 या शैक्ष.वर्षात झालेल्या परीक्षेमध्ये शाळा निगुंडळ न.2 शाळेतील स्वराज

पर्शुराम मुकनाक याने जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे.

या परीक्षेसाठी शाळेतून एकूण 6 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये सर्वच्या सर्व विध्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले.शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून स्वराज पर्शुराम मुकनाक इयत्ता दुसरी हा विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यात पाचवा व महाराष्ट्र राज्यात दहावा आला. त्याला साईकृपा शेळके मंगल कार्यालय किरवली ,तालुका – कर्जत जिल्हा रायगड येथे गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .त्याला त्याचे आई-वडील व शिक्षिका परडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. निगुंडळ गावाच्या वतीने त्याचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.