मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या मागणीला यश
गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील जानवळे मार्गावरील एस . टी.च्या बंद झालेल्या फेऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या पुढाकाराने पूर्वरत सूरू झाले असून जानवळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.जानवळे रस्ता खराब असल्यामुळे जानवळे मार्गावरील फेऱ्या तूर्तास बंद ठेवण्यात आलेल्या होत्या.
परंतु सदर एसटी बस सुरू कराव्यात अशी मागणी केली होती एसटी सुरू असलेल्या सकाळी ०७:४५ वा.गुहागर – परचुरी व सायंकाळी ६:४५ गुहागर – पांगारी (वस्ती) या फेऱ्या पूर्वव्रत चालू करण्यात आलेल्या आहेत. दोन्ही फेऱ्या पूर्व सुरू झाल्याने या मार्गावर असलेल्या सर्व प्रवाशांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. या मार्गावरील सर्व प्रवाशांनी या एसटीचा लाभ घ्यावा असे आवाहननही उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर तसेच शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर यांनी केले आहे.












