गावखडी / वार्ताहर
पायी हळू हळू चाला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला… जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल…असा जयघोष करीत निघाली रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी सोहळा.
हा दिंडी सोहळा मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, संजया पावसकर, पदवीधर शिक्षक डाॅ. आनंद सावंत, शिक्षिका ऐश्वर्या गुरव आदि शिक्षकवृंदां च्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आली होता.
हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणून “आषाढी एकादशी “ओळखला जातो.पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून आषाढी एकादशीला वारकरी मेळा भरला जातो.त्याच निमित्ताने टाळ मृदुंग, पताका भगवा झेंडे हातात घेऊन नऊवारी साड्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, वारकरी संप्रदायातील वेशभूषा परिधान करून जिल्ह्य परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वीतील विद्यार्थी पंढरपूरच्या विठोबाचे जयघोष करत आम्हाला अभ्यासात यश लाभो ,चांगले आरोग्य लाभो असे साकडे पांडुरंगाला घालत आहेत.
या उत्सवानिमित्त पंढरपूरचा विठ्ठलाची भूमिका कु.रूद्र संदिप चंदूरकर आणि रुक्मिणी ची भूमिका श्रीया अरविंद चंदूरकर या विदयार्थीने उत्कृष्ट रित्या साकारली आहे.हा नेत्रदीपक सोहळा आज मेर्वी पंचक्रोशीत आकर्षणाचा ठरला आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची एकजूट, परस्परातील प्रेम वृद्धिंगत होते .
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, पदवीधर शिक्षक आनंद सावंत, शिक्षिका ऐश्वर्या गुरव आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंगेश म्हादये, आणि सर्व पदाधिकाऱ्यांकडून बहुमोल परिश्रम घेतले आहेत












