कोलगावमध्ये उद्या क्षेत्रपाल एंटरप्रायजेस या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते होणार शुभारंभ

सावंतवाडी : प्रतिनिधी
कोलगाव कुणकेरी तिठा येथे क्षेत्रपाल इंटरप्रायजेस या आपले सरकार सेवा केंद्राचा (सीएससी सेंटर) शुभारंभ रविवार ११ जून रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास वासुदेव नाईक, सीएससी राज्य समन्वयक सुयोग दिक्षीत, जिल्हा व्यवस्थापक परेश परब उपस्थित राहणार आहेत.
या केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शासकीय सेवा, प्रमाणपत्रे, दाखले, लाईट बील, डिटीएच रिचार्ज, सर्व प्रकारच्या गाड्यांचे इन्शुरन्स, मतदान कार्ड नोंदणी, बांधकाम कामगार नोंदणी, एचडीएफसी बँक अकाउंट ओपनिंग, बॅलन्स चेक, लाईफ इन्शुरन्स, पीएम किसान रजिस्ट्रेशन इ. सेवा देण्यात येणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेंटरचे संचालक सिताराम उर्फ अण्णा केळुसकर यांनी केले आहे.