पन्हळी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची निघाली वारकरी दिंडी

खंडाळा | वार्ताहर :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हळी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”चा जयघोष करत परिसरात प्रदक्षिणा घातली.
मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनीही या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अभंग गायन, हरिपाठ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख निर्माण होऊन सांस्कृतिक मूल्यांची जोपासना झाली