सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या कोसळलेल्या भिंतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी 

सावंतवाडी : प्रतिनिधी l संस्थानकालीन जिल्हा कारागृहाची सुमारे १४३ वर्षांपूर्वीची, काळ्या दगडापासून बांधलेली संरक्षक भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

 

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महिला मोर्चा अध्यक्ष श्वेता कोरगावकर, गुरुनाथ पेडणेकर, पोलिस उप अधीक्षक विनोद कांबळे, जिल्हा कारागृह अधीक्षक संजय मयेकर, सावंतवाडी कारागृह अधीक्षक सतीश कांबळे, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता वैभव सगरे, अभियंता विजय चव्हाण यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

अंदाजे ४० मीटर लांबीची ही भिंत कोसळल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व घटनेची पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी माहिती घेतली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी सूचना दिल्या.