रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात शनिवारी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष प्रवेशित, नवागतांचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रम अतिशय आनंदी वातावरणात पार पडला.
सुरवातीला द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यात आली. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी कलाविष्कार सादर केले. त्यानंतर फनी गेम्स घेण्यात आले व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमातील सहभागातून मिस फ्रेशर हा किताब शुभांगी पोटे (प्रथम वर्ष कला) व मिस्टर फ्रेशर हा किताब साईराज शिंदे (प्रथम वर्ष विज्ञान) यांना देऊन प्र. प्राचार्य मधुरा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी नवागतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. राखी साळगावकर, विज्ञान विभागप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, समारंभ समिती प्रमुख प्रा. वैभव कीर व इतर प्राध्यापक उपस्थित होते. प्रथम व द्वितीय वर्षातील तिन्ही शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरवी ओळकर हिने केले.











