गुहागर प्रतिनिधी
तवसाळ गावचे सुपुत्र, यशस्वी इलेक्ट्रिकल व्यावसायिक सचिन विश्वनाथ सुर्वे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते ५० वर्षाचे होते.
भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस, गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे यांचे ते मोठे बंधू होते. गेली ६ वर्षे ते कर्करोगाने त्रस्त होते. हेदवी येथे वास्तव करत ते विकास जोगळेकर यांच्याकडे सुरूवातीच्या काळात इलेक्ट्रिक कामे करत होते त्यानंतर त्यांनी स्वतः चा इलेक्ट्रिक व्यवसाय सुरू करून ते यशस्वी व्यावसायिक झाले होते. हेदवी पंचक्रोशीतील त्यांचे नाव सर्वदूर पसरले होते. नाटक, तमाशा, भजन, सार्वजनिक सामाजिक, धार्मिक कार्यक्रम ते अग्रेसर होते. एक अजातशत्रू हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,आई, वडील, काका, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात तवसाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आमदार डॉ विनयजी नातू, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सभापती प्रणव पोळेकर, पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, संदिप गोरिवले आदींसह विविध स्तरातील लोकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.












