.
ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे शाळा नंबर एक च्या मुलांनी शाळा नंबर 1 ते रवळनाथ मंदिर अशी काढलेली दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सर्वत्र सध्या आषाडी एकादशी चे भक्तिमय वातावरण असून गावागावातून वारीसाठी वारकरी पंढरपूर येथे दाखल झाले असताना ज्ञान पंढरीच्या वारकऱ्या नी खांद्यावर ज्ञान पताका घेत काढलेली दिंडी औत्सुक्याचा विषय बनली होती.दिंडीतून वारीचे वातावरण निर्माण करत छोट्या छोट्या मुलांनी वारकऱ्यांच्या वेषात वारीत नाचत गाजत वातावरण भक्तिमय करून टाकले.ही वारी रवळनाथ मंदिर पर्यंत ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, चा नामघोष करत टाळ मृदूंगाचा गजर करत नाचत डोलत मंदिराकडे गेली.मंदिराकडे फुगड्या गाणी गात मंदिर परिसर भक्तिमय करून टाकला.यावेळी उपस्थित भावीक भक्तांनी मुलांचे कौतुक केले. लहान मुलांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणी तर लोकांच्या कौतुकाचा विषय बनला होता.वारीत लोकांना साक्षात विठ्ठल रखुमाईच दर्शन मुलांनी घडवील. छोटया मोठ्या मुलांबरोबर च यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षक वृंदाचेही ग्रामस्थानी कौतुक केले.













