डॉ. संजय भावे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, रत्नागिरी यांची

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला भेट

रत्नागिरी, दिनांक: ०५ जुलै २०२५.
दिनांक ५ जुलै २०२५ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला’ भेट देऊन चालू असलेल्या संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेऊन संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी वर्गास मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वप्रथम, ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ चे नव-नियुक्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. संजय भावे, मा. कुलगुरू यांचे स्वागत केले. कुलगुरू महोदय यांनी संशोधन केंद्राच्या झाडगाव येथील तलावांचा आढावा घेतला. तलावांमध्ये चालू असलेले मत्स्य संवर्धन आणि संवर्धना दरम्यान येणाऱ्या समस्या याबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. तलावामध्ये बोयर माशांचे बिज सुद्धा सोडून त्यांचे संवर्धन करण्याचे त्यांनी सूचित केले. मत्स्य संवर्धन प्रयोगशाळा मधील चालू असलेले शोभिवंत माशांचे बिजोत्पादन, शैवाळ बिज बँक चा प्रयोग, अक्वॉपोनिक प्रकल्प, पाण वनस्पती संवर्धन, यासारख्या विविध कामांची पाहणी करून आढावा घेतला. संशोधन केंद्रामध्ये ‘विद्यापीठ परिभ्रमण निधी’ अंतर्गत चालू असलेले ‘मत्स्यालय व संग्रहालय प्रदर्शन’ आणि ‘तलावामध्ये नौकाविहार’ या प्रकल्पाबाबत मा. कुलगुरू महोदयांनी समाधान व्यक्त केले. संशोधन केंद्राची पेठकिल्ला, रत्नागिरी येथील नविन ईमारत बांधकाम याबाबत सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच संशोधन केंद्राच्या भविष्यातील शेतकारीभुमिक कार्यासाठी विविध सूचना त्यांनी केल्यात.


यावेळी ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ चे डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरीश धमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते व श्रीम. अपुर्वा सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक), श्री. सचिन पावसकर (लिपिक), श्री. दिनेश कुबल (बोटमन) तसेच प्रा. एम. टी. शारंगधर (सहयोगी प्राध्यापक) व डॉ. वैभव येवले (विषय तज्ञ) हे सुद्धा उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन डॉ. आसिफ पागरकर यांनी केले.