चिपळूण (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळा सावर्डे येथे आषाढी एकादशी व रमजान ईद हे दोन सण योगायोगाने एकाच दिवशी आले आहेत. याचे औचित्य साधून राष्ट्रीय सलोखा टिकून राहावा यासाठी विद्यार्थ्यांकडून छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकरी वेशामध्ये तसेच मुली नऊवारी साडी डोक्यावर तुळस या वेशभूषेमध्ये आल्या होत्या. सर्व विद्यार्थी रांगेने सह्याद्री संकुलामध्ये नेण्यात आले. या वेळेचे दृश्य पंढरपूर अवतरल्यासारखे दिसत होते. त्यानंतर सर्व मुली डोक्यावर तुळशी घेऊन नाचत होत्या तसेच मुलगे पालखी घेऊन नाचत होते. या कार्यक्रमासाठी शकील मोडक, सुहास भंडारी, अनिल रेडेकर, सतीश वारे, प्रणित राजेशिर्के रसिका सुर्वे, सेजल साळवी, अक्षता घाग, प्रणिता दिंडे, मनीषा शिंदे, स्मिता सावंत, सोनाली राठोड, पुनम चांदेकर, रूपाली कुंभार, सायली शिर्के, योगिता गावडे, गायत्री वनकुते, सोनाली केळकर, गायत्री साठे, श्रुती कांबळे, पूनम भुवड, स्नेहल नवरंग, रंजना चव्हाण,आदिती बागवे, अश्विनी पवार आदी उपस्थित होते.












