चिपळूणमध्ये काँग्रेसचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर

चिपळूण (प्रतिनिधी) : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चिंचनाका परिसरात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी समर्थन दर्शविणारे पोस्टर हातात घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सोनलक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे राहत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीसाठी नसून समाजाच्या हितासाठी असल्याचे सांगत सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही सरकारने गंभीर दखल घेतलेली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, नगरसेवक साजिद सरगुरोह व पदाधिकारी उपस्थित होते.