लांजा (प्रतिनिधी) लांजातील सुप्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद तेंडुलकर यांचे सुपुत्र डॉ. सुश्रुत प्रमोद तेंडुलकर यांनी रत्नागिरी ते नव्याने सुरू केलेल्या क्लिनिकचे (दवाखाना) उद्घाटन नुकतेच पार पडले.
डॉक्टर सुश्रुत हे सर्जन असून त्यांचे MBBS DNB(Surgery) FACRSI FIAGES असे शिक्षण मुंबई येथे झालेले आहे. शिक्षणानंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित अशा तीन मोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम पाहिलेले आहे. याशिवाय हे काम करत असताना त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वीपणे केलेल्या आहेत. डॉक्टर सुश्रुत यांनी तेंडुलकर यांनी पोटाच्या शस्त्रक्रियेत तसेच इंडोस्कोपी मध्ये विशेष फेलोशिप्स घेतलेल्या आहेत.
डॉ सुश्रुत प्रमोद तेंडुलकर यांनी सुरू केलेले नवीन क्लिनिक रत्नागिरी येथील डॉ गोंधळेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे. दरम्यान, या उद्घाटन प्रसंगी
डॉ सुश्रुत यांचे कुटूंबीय, डॉ श्री व सौ गोंधळेकर, तसेच रत्नागिरी मधील अनेक प्रतिथयश वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. नवीन क्लिनिक च्या उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवरांनी डॉ सुश्रुत तेंडुलकर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वैद्यकीय सेवेचा रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











