दोडामार्ग l सुहास देसाई : दोडामार्ग ते बांदा मार्गावर सासोली सरपंच बळीराम शेटये यांच्या घराच्या अंगणातील पत्र्याच्या शेडला कँटर ने जोरदार धडक दिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर अपघातात सरपंच बळीराम शेटये यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली. या मध्ये अंगणातील शेड पूर्णतः तुटून पडली व अंगणात असलेल्या ओमनी कार गाडीला ही धडक बसून लाखो रुपयांची नुकसानी झाली आहे
अधिक माहिती अशी की गोवा येथून निघालेला बांदा दिशेने जाणाऱ्या आयशर कँटर सासोली येथील एका वळणावर आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट लगतच्या सरपंच बळीराम शेटये यांच्या घराच्या अंगणात घुसली त्यामुळे पत्र्याची शेड तुटून पडली. ही धडक एवढी मोठी होती की ,शेडचे पोल तुटून पडले पत्र्यांचा त्याचा चुराडा झाला होता तसेच सरपंच यांची पत्नी घराच्या अंगणात होती तिच्या हातावर घराची कौले पडल्याने ती किरकोळ जखमी झाली. तसेच अंगणात उभी करून ठेवलेल्या ओमनी गाडीला ही धडक बसल्याने तिचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात शेटये यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचे समजते
सरपंच बळीराम शेटये यांनी यावर्षीच घराच्या अंगणात पत्र्याची नविन शेड बांधली होती. लाखो रुपये खर्च करून उभी केलेली शेड काही दिवसातच मोडून पडली असल्याने नुकसान झाले आहे शेड बरोबर अंगणात उभे करून ठेवलेल्या गाडीची ही मोडतोड झाली. आहे
दरम्यान अपघात घटना स्थळी उपस्थित ग्रामस्थ म्हणाले की सासॊली सरपंच यांच्या घरात समोरील वळण हे धोकादायक आहे यापूर्वी ही त्या ठिकाणी बरेच अपघात झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर दोडामार्ग बांदा मार्गावरील हे धोकादायक वळण काढावे अशी मागणी वाहन चालक व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे
फोटो :-
दोडामार्ग ते बांदा रस्त्यावरील सासोली सरपंच बळीराम शेटये यांच्या घराच्या शेडला धडकलेला कँटर.
छाया :- सुहास देसाई











