आंदुर्ले ग्रामपंचायतचा कृषी दिन उत्साहात साजरा

आंदुर्ले ग्रामपंचायतच्या वतीने कृषीदिन साजरा करण्यात आला.माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील प्रगतशील शेतकरी श्री.मंगेश भाईप, श्री.गणपत येरम, श्री.रविंद्र मयेकर यांचा यानिमित्ताने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर गावातील मुणगी स्मशानभूमी येथे सागाची रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले.व त्यानंतर कृषी विभाग यांच्यावतीने आयोजित शेतीशाळेमध्ये भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले.अशाप्रकारे विविध उपक्रमांद्वारे आंदुर्ले ग्रामपंचायतच्या वतीने कृषी दिन साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच श्री.अक्षय तेंडोलकर, उपसरपंच श्री.चंद्रकीसन मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य, सौ.अनुराधा साळगांवकर,सौ.स्मिता पिंगुळकर, श्री.अनिल भगत, गावातील सी आर पी ताई, अंगणवाडी सेविका,तलाठी, पोस्टमास्तर, शेतकरी तसेच महीला, ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती.