विठ्ठलाच्या नामघोषात दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित विद्याभारती प्राथमिक विभागामध्ये आनंदवारी कार्यक्रम उत्साहात साजरा…

दापोली l प्रतिनिधी:-विठुराया आणि आषाढी एकादशीचे महत्व सर्व मुलांना समजावे या उद्देशाने विद्याभारती प्राथमिक विभागामध्ये आनंदवारी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन ओम साईनाथ वारकरी संप्रदाय निगडे या मंडळाचे संस्थापक ह .भ.प. श्री पाडुरंग रेवाळे बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच्या बरोबर अनेक वारकरी यात सहभागी झाले होते. या कार्यकमाचे सूत्रसंचालन श्री. रेवाळे सर, प्रस्थाविक श्री. नवरत सर यांनी केले. टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी ,रिंगण व पालखी आगमनाने झाली.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या तसेच वारकरी ,नऊवारी साडी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सौ. रेवाळे बाई यांनी अभंगाने संपूर्ण वातावरण अगदी भक्तीमय केले. सांस्कृतिक प्रमुख सौ. भांबीड बाई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या कार्यक्रमासाठी कला शिक्षक श्री. बुरटे सर,सौ. मेहता बाई, सौ. पाटील बाई, विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अशाप्रकारे शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल शेठ सर, विद्याभारती प्रमुख श्रीम. परब बाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात पार पडला.