शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील शिरगाव येथील आर. के. फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत केंद्रशाळा साळशी या प्रशालेस सौंदर्यवर्धक झाडांची देणगी देण्यात आली. शाळेच्या परिसरात हिरवळ वाढवणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
आर. के. फाउंडेशन ही संस्था समाजोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असून, यापूर्वीही त्यांनी स्वच्छता मोहिमा, शालेय साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमानिमित्त या शाळेचे केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम यांनी आर. के. फाउंडेशनचे अध्यक्ष अमित साटम यांचे मनःपूर्वक आभार मानले. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात व मूल्यशिक्षणात असे उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरतात,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आर. के. फाउंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष अमित साटम, माजी सरपंच वैभव साळसकर, किशोर साळसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश गावकर, केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.












