एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल , कम्प्युटर सायन्स, मॅकट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग या शाखांच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावलेले आहे. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागातून कुमार करण राऊळ याने ९.२७ SGPI सह प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कु. जागृती मिस्त्री हिने ८.९५ SGPI सह द्वितीय क्रमांक, कु. शाहिद शेख याने ८.९१ SGPI सह चौथा क्रमांक , कु. दर्शन नार्वेकर याने ८.८२ SGPI सह पाचवा क्रमांक , कु. देवांग तेली याने ८.५५ SGPI सह नववा क्रमांक मिळवलेला आहे. कम्प्युटर सायन्स विभागातून कुमार यश घाडीगांवकर याने ९.१८ SGPI सह प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कुमार ओम पारकर याने ८.५९ SGPI सह द्वितीय क्रमांक आणि कुमारी रसिका वर्दम हिने ८.४५ SGPI सह तृतीय क्रमांक मिळवला आहे . मेकॅट्रॉनिक्स विभागातून कुमार अनिकेत कदम याने ८.८२ SGPI सह द्वितीय क्रमांक आणि कुमार वैभव हरमळकर याने ८.४८ SGPI सह तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स विभागातून कुमारी तनया पांचाळ ८.९१ SGPI सह नववा क्रमांक , पूर्वा बाकरे ८.७७ SGPI सह चौदावा क्रमांक, नेहा वस्त ८.७ SGPI सह सोळावा क्रमांक आणि समीक्षा सांडव हिने ८.६८ SGPI सह सतरावा क्रमांक मिळून गुणवत्ता यादी मध्ये आलेले आहेत.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांची कठोर मेहनत आणि सर्व प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शनाचे फळ आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर, संस्थापक सन्मा. नारायणराव राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष डॉ. निलेशजी राणे, सचिव निलेशजी राणे यांनी अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.













