हरिनाम सप्ताहाची सोमवारी होणार सांगता
ओटवणे( प्रतिनिधी) भालावल गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हरीनाम सप्ताह रविवार २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सात प्रहराच्या या हरिनाम सप्ताहाची सांगता दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी होणार आहे.
यानिमित्त रविवारी सकाळी मंदिरात विधिवत हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाल्यानंतर भालावल परीसरातील वारकरी भजन मंडळे आपली सेवा श्री चरणी अर्पण करणार आहेत. हरिनामाचा गजर अखंड सुरु राहणार आहे. सोमवारी दुपारी या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
मंदिरात पार पडणाऱ्या या हरिनाम सप्ताहाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भालावल देवस्थान मान मानकरी आणि ग्रामस्थ यांनी केले आहे.












