गुहागर l प्रतिनिधी :जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये गणवेशाचे वाटप करण्यात आले.त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिल्पाताई कोळथरकर, ग्रामपंचायत तंटामुक्त समिती अध्यक्ष, शिक्षण तज्ञ व शासनमान्य कलाकार श्री शंकर कोळथरकर, सांस्कृतिक कला गौरव पुरस्कार प्राप्त शासन मान्य कलाकार उदयजी रोहीलकर, पालक संघाचे आदेशजी कोळथरकर ,मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील, सर्व शिक्षक धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, विद्यार्थी प्रतिनिधी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.शाळेला वेळोवेळी बहुमोलाचे सहकार्य करत असल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीतर्फे उदय रोहीलकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी बोलताना सांस्कृतिक गौरव पुरस्कार प्राप्त शासनमान्य कलाकार उदय रोहीलकर म्हणाले की विविध उपक्रमांद्वारे शाळेचा सर्वांगीण गुणवत्ता पूर्ण विकास होत असून शाळा प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याबद्दल मला शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून अभिमान वाटतो.शाळेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .शाळेमध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिल्पाताई कोळथरकर यांनी शालेय पोषण आहारासाठी काही पिण्याच्या पाण्यासाठी भांडी देणगी दाखल दिली त्याचा स्वीकार मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्वंतरी मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुषमा गायकवाड यांनी केले












