विजयदुर्ग ( प्रतिनिधी) 3 जुलैपासून सुरू झालेल्या विठ्ठल मंदिर आषाढी हरिनाम सप्ताहाची सांगता आज विजयदुर्गमध्ये ठीकठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडून करण्यात आली. यावेळी पालखीचे स्वागत विजयदुर्गातील सर्व प्रहारकरी मंडळाच्या महिलांनी आरती ओवाळून केले . विजयदुर्ग मधील हा सर्वात मोठा उत्सव असल्याने संपूर्ण गाव सात दिवस दिवस रात्र या महोत्सवात सहभागी होत असतो. गावातील सात प्रहरकरी विठूनावामध्ये तल्लीन होऊन हा उत्सव यशस्वी करतात. यावर्षीही हा उत्सव सर्व विठ्ठलभक्तांच्या सहकार्याने संपन्न झाला. विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष महेश बिड्ये, सचिव संजय सावंत, खजिनदार दीपक करंजे, मंदिराचे मालक महेश सारमंडळी तसेच अनेक विठ्ठलभक्तानी हा धार्मिक उत्सव यशस्वी केला.












