प्रशालेच्या कु.समृध्दी बडेचा राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक
*फोंडाघाट | कुमार नाडकर्णी —* *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, व्होकेशनल ॲण्ड सायन्स च्या इयत्ता 8 वी मधील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवत प्रशालेचा नावलौकिक वाढवला आहे.प्रशालेचे यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.*
*1)कु.समृध्दी रामदास बडे* -राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती/जिल्ह्यात तृतीय क्रमांक
*2)कु.वेदांगी प्रशांत तानावडे* -सर्वसाधारण ग्रामीण शिष्यवृत्ती तृतीय क्रमांक
*3)कु.सिध्दी सुधीर पारकर*- सर्वसाधारण ग्रामीण शिष्यवृत्ती चौदावा क्रमांक
*4)पार्थ रविंद्रनाथ गुरव*- सर्वसाधारण ग्रामीण शिष्यवृत्ती एकविसावा क्रमांक
*5) हेरंब राजेश रावराणे*- सर्वसाधारण ग्रामीण शिष्यवृत्ती
*6)सोहम दत्तात्रय नातू* सर्वसाधारण ग्रामीण शिष्यवृत्ती
*7)कु.यशदा अनिल भोगले*- सर्वसाधारण ग्रामीण शिष्यवृत्ती
*8)कु.कादंबरी जगदीश तायशेटे*- सर्वसाधारण ग्रामीण शिष्यवृत्ती
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक सौ.स्ने.सं रेवडेकर,सौ.आ.अ.भोगले, श्री.वि.पां.राठोड, श्री.ग.ह.घुंगरड, श्री.भ.रा.कदम, यांचे मार्गदर्शन लाभले.
*या उत्तुंग यशाबद्दल सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी मा.श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार मा.श्री.वि.रा.तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा.श्री.द.दि.पवार, मा.संचालक फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच पंचक्रोशीत पालकवर्गातून हार्दिक अभिनंदन होत आहे.*











