रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्षपदी शिवानंद भिडे यांची नियुक्ती

मंगळवार १५ जुलै रोजी पदग्रहण सोहळा

बांदा l प्रतिनिधी :       रोटरी क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी शिवानंद भिडे, सचिवपदी स्वप्नील धामापुरकर व खजिनदारपदी सुदन केसरकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मावळते अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ बांदाच्या रोटरी वर्ष २०२५-२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ सभागृहात पार पडणार आहे.

 

या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून अमित माटे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. विनया बाड, डॉ. विद्याधर तायशेटे, राजेश घाटवळ हे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रोटरी पदाधिकारी व रोटरी सदस्य हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. समाजातील गरजू आणि वंचितांसाठी रोटरी क्लब ऑफ बांदा नेहमीच सहकार्याची भावना जपत समाजोपयोगी कार्य करीत राहील. या कार्यात सर्व बांदावासियांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मावळते अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.