वि. मं. कोकिसरे नारकरवाडीतील विद्यार्थ्यांनी केली भात लावणी
वैभववाडी l प्रतिनिधी : बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत विद्या मंदिर कोकिसरे नारकरवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भात लावणी करत शेतीचे धडे गिरवले. आज पारंपारिक शेतीबरोबर शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरुन करण्यात येणाऱ्या शेतीबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बांधावरची शाळा या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे स्थानिक शेतकऱ्यांनी कौतुक केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टर च्या सहाय्याने नांगरणी, तरवा काढणे व भात लावणी केली. स्थानिक शेतकरी दाजी पाटणकर यांच्या भातशेतीत प्रशालेतील ६५ विद्यार्थी भात लावणीसाठी उतरले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग कोकरे, शिक्षिका सौ. संध्या शेळके, श्री. संजय कावळे, सौ. संगीता चव्हाण, शेतकरी चंद्रकांत पाटणकर व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.











