प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयितांना आता १५ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन.

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सावंतवाडी, माठेवाडा येथील विवाहिता प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी देवगड येथील प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांसह संशयित मिलिंद माने यांना १५ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ मिळाली आहे. याबाबत पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे.

सावंतवाडी, माठेवाडा येथील विवाहित महिला प्रिया चव्हाण यांनी आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.या आत्महत्येप्रकरणी प्रिया चव्हाण यांच्या आई-वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रिया चव्हाण यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. तर याप्रकरणी संशयित सह आरोपी मिलिंद माने यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर प्रणाली माने आणि आर्य माने यांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज, ११ जुलै रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत म्हणजेच १५ जुलैपर्यंत या दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ मिळाली आहे. तर संशयीत मिलिंद माने याला देखील १५ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.