बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरमध्ये मातृपपूजन

रत्नागिरी :
भारत शिक्षण मंडळ संचलित बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघर मध्ये गुरुपौर्णिमे निमित्त मातृपपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच गुरुशिष्य परंपरा, गुरुशिष्यांच्या जोड्या करुन विद्यार्थ्यांनीं जिवंत देखावे साकारले.

भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ.नमिता ताई कीर मॅडम ,मा.रमेश पटवर्धन सर, शाळा समिती अध्यक्ष, राजेंद्र कदम, प्रबंधक विनायक हातखंबकर, सन्माननीय सर्व सदस्य, यांनी श्री. व्यास मुनींच्या प्रतिमेचे, पुस्तकाचे ,झाडाचे पूजन केले.प्रमुख अतिथी पटवर्धन हायस्कूलचे माजी शिक्षक मा . श्री. रमेश जी पटवर्धन सर यांचे शिष्य हातखंबकर सर, नमिता ताई आणि बाल विभागाच्या सर्व शिक्षिका सेविका ताई यांनी औक्षण केले. साक्षात गुरुपरंपरा साकारली गेली. बालगोपालांनी ‘एकएक झाड लावून ममतेने;या गाण्याचे सादरीकरण केले. पालक प्रतिनिधी मंडळातर्फे शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
.या कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी पालक बंधू भगिनीं ,आदि मान्यवर उपस्थित होते.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी पावसकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन बालमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री मुसळे यांनी केले. सर्व शिक्षिका व सेविका ताईंचा सक्रिय सहभाग होता.