सचिवपदी डॉ. नामदेव गवळी, तर खजिनदारपदी सौ. स्नेहल रावराणे यांची निवड
१३ जुलै रोजी होणार पदग्रहण सोहळा
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सचिन रावराणे यांची निवड झाली आहे. तर सचिवपदी डॉ. नामदेव गवळी, खजिनदारपदी सौ.स्नेहल रावराणे यांची निवड जाहीर झाली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवार दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. महालक्ष्मी हॉटेल सभागृह येथे होणार आहे. येथील रोटरी क्लबच्या कार्यकारणीची मुदत ३० जूनला संपली. त्यानंतर सन २०२५- २६ करिता नवीन कार्यकारिणी करण्यात आली.

या कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा गव्हर्नर प्रतिनिधी रोटरीयन विक्रांतसिंह कदम व असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन डॉ. प्रशांत कोलते यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गजानन कोलते यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निहाल रावराणे आणि आर्य मोरे या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सचिन रावराणे यांनी दिली.












