कै. महेश परब स्मृती प्रित्यर्थ डॉ अजित साटेलकर मित्र मंडळाचे आयोजन
वेंगुर्ले : प्रतिनिधी
कै. महेश परब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. अजित साटेलकर मित्रमंडळ, वेंगुर्ला आयोजित कै. महेश परब स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा – २०२६ उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे संपन्न झाली. या स्पर्धेला श्री चेस अकॅडमी व नवजीवन चेस अकॅडेमी यांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेत १६ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १० वर्षांखालील अशा विविध वयोगटांतील १२२ बुद्धिबळपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि डावपेचांचे दर्शन घडविले. कार्यक्रमाचे उदघाट्न डॉ. वसुधा मोरे – योग शिक्षिका, सौ. वृंदा कांबळी – ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका व माजी शिक्षिका तसेच सौ. अस्मि साटेलकर, डॉ. अजित साटेलकर, श्री. गजानन परब, माजी उपसरपंच हेमंत गावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने पार पडले. यावेळी श्री जयेश परब, सागर करंगुटकर, निनाद दिपनाईक,बाळकृष्ण मयेकर, भुवनेश परब, संकेत साळगावकर,आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अजित साटेलकर , श्री हेमंत गावडे यांनी कै. महेश परब यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित अनेक भावनिक प्रसंग सांगितले. स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथमच प्रत्येक गटामध्ये आकर्षक चषक, रोख रक्कम, पदके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सातेरी देवस्थान चे विश्वस्थ श्री रवींद्र परब, श्री विष्णू उर्फ पपू परब तालुकाध्यक्ष भाजपा वेंगुर्ला तसेच सौं गौरी मराठे नगरसेविका वेंगुर्ला, डॉ अजित साटेलकर कृषी अधिकारी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र,यांचे हस्ते पार पाडले.
या स्पर्धेचा निकाल असा :
10 वर्षा खालील गट.. 1) विहान असपतवार 2) विघ्नेश अंबापूरकर 3) अन्वय सापळे 4) प्रज्वल नार्वेकर 5):मोहिषा जाधव 13 वर्षाखालील गट.. 1) दुर्वांक मलबारी 2) प्रसन्ना सामंत 3) यश सावंत 4) योगेश सामंत 5) अथर्व वेंगुर्लेकर 16 वर्षाखालील गट.. 1) वरद तंवटे 2) तनिष तेंडोलकर 3) रुद्र मोबारकर 4) वसंत गवस 5) यथार्थ डांगी उत्कृष्ट खेळाडू वेंगुर्ला (मुलगा) :सन्मिल अजित साटेलकर.. उत्कृष्ठ खेळाडू वेंगुर्ला (मुलगी) : गार्गी संदीप परब, डॉ. अजित साटेलकर तसेच त्यांचे मित्रमंडळ, यांनी या स्पर्धेसाठी मोठी मेहनत घेतली.













