मसुरे | झुंजार पेडणेकर :गोळवण शिसेगाळुवाडी येथे श्री. आबा चव्हाण यांचे घरी श्री पद्धतीने भात पीक लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी गोळवण सरपंच श्री सुभाष द. लाड, उपसरपंच श्री शरद रा. मांजरेकर, सहा. प्राध्यापक मुळदे डॉ. विजय पालसांडे , कट्टा गावचे प्रगतशील शेतकरी श्री. आनंद रावले, उपकृषि अधिकारी कट्टा श्री. डी के सावंत, ग्रा. पं.सदस्य श्रीम. प्राजक्ता चिरमुले, पीक विमा समन्वयक श्री. माईणकर, प्रकल्प सहयोगी श्री आशिष जाधव, कृषी सेवक श्री नितेश पाताडे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गोळवण कुमामे डिकवल येथील सुमारे शंभर शेतकरी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पालसांडे सर यांनी GOI UNDP GCF ECRICC अंतर्गत श्री भात पीक लागवडीबद्दल तांत्रिक मार्गदर्शन केले.श्री पद्धतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतकरी संपन्न होईल अशी ग्वाही दिली. श्री आनंद रावले यांनी स्वअनुभवातून करत असलेल्या श्री भात पीक पद्धतीचे फायदे उपस्थितांना सांगितले. सदरील कार्यक्रमाला गोळवण कुमामे डिकवल मधील प्रगतशील शेतकरी सत्यविजय पालव, नंदादीप नाईक, नामदेव परब, नामदेव चव्हाण, नारायण परब, सुहास घाडी, दिपश्री आंगचेकर, सागरिका लाड, उत्तम पाताडे, संतोष चव्हाण, मिलिंद लोहार, गुरुनाथ पालव, मनोहर परब दिवाकर परुळेकर इत्यादी शेतकऱ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.UNDP GCF ECRICC कार्यक्रमांतर्गत SRI भात पीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे मनोगत व आभार प्रदर्शन सरपंच श्री सुभाष लाड यांनी केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सेवक श्री नितेश पाताडे यांनी केले.
Home ताज्या घडामोडी “श्री” भात पीक लागवड पद्धतीने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल – डॉ.विजय पालसांडे गोळवण...












