माजगाव : ग्रामपंचायत माजगावने आपल्या कार्यक्षेत्रात स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करू नये असा ठराव घेतला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) सावंतवाडी कार्यालयास अधिकृत पत्र पाठवले आहे.
स्मार्ट मीटरमुळे ग्रामस्थांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, हे काम करू नये अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
गावात पारंपरिक (जुने) मीटरच वापरात ठेवावेत आणि नवीन स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी स्पष्ट विनंती करण्यात आली आहे.












