श्रीमती मनोरमा रांगणेकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

 

सावंतवाडी: (प्रतिनिधी) माठेवाडा, सावंतवाडी येथील मूळच्या रहिवासी आणि चितारआळी येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती मनोरमा सीताराम रांगणेकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात विवाहित मुली, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या निवृत्त अव्वल कारकून सौ. प्रिया पुरुषोत्तम हवालदार आणि पाटबंधारे सर्वेक्षण उपविभाग, चराठे येथून वरिष्ठ लिपिक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सौ. स्वाती सुभाष बांदेकर यांच्या त्या मातोश्री होत. तसेच, डॉ. सिद्धेश बांदेकर आणि निखिल बांदेकर यांच्या त्या आजी होत.