देवगड : प्रतिनिधी
देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका नौकेवरील खलाशी दिपक जोहन कुल्लू(४४) मुळ रा.ओडीसा सध्या रा.देवगड जेटी याची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला देवगड जेटी येथे आणण्यात आले.तेथून त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तेथिल वैद्यकीय अधिकाèयांनी त्याला मृत घोषित केले.ही घटना १२ मे रोजी पहाटे १.३० वा.सुमारास घडली.या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिपक कुल्लू हा देवगड येथील अशोक चंद्रकांत सारंग यांच्या ओंकारेश्वरी नौकेवर खलाशी म्हणून कामाला होता.नौकेवरून तो मासेमारी करण्यासाठी देवगड समुद्रात गेला असता अचानक त्याचा छातीत व पोटात दुखू लागल्याने त्याला देवगड जेटी येथे आणण्यात आले.यावेळी त्याची कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती.त्याला तात्काळ उपचारासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचार सुरू करण्यापुर्वीच तेथिल वैद्यकीय अधिकाèयांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेची फिर्याद रोशन पीटर कुल्लू(२३) मुळ रा.ओडीसा सध्या रा.देवगड जेटी यांने देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.घटनेचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रविण सावंत करीत आहेत.












