अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या वीज प्रश्नांची ऊर्जा विभागाकडून गांभीर्याने दखल

ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी बोलावली उच्चस्तरीय आढावा बैठक

वीज समस्या बाबत योग्य त्या उपाययोजना राबवण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांची विधिमंडळातील दमदार कामगिरी महाराष्ट्र अनुभवत असताना त्यांच्या मागण्यांची दखल विधिमंडळ व मंत्रालय स्तरावर तात्काळ घेतली जात आहे. सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी वीज समस्या बाबात प्रश्न उपस्थित केले. त्याची गांभीर्याने तात्काळ दखल घेत चालू अधिवेशनातच ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी बैठक बोलावली. महत्वाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. हे सर्व पाहता मालवण कुडाळला निश्चितच हक्काचे नेतृत्व मिळाले आहे. जनतेचा आवाज विधिमंडळात पोहचत आहे. जनतेला न्याय मिळतं आहे. अश्या भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी संपूर्ण आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मांडणी करताना सभागृहात वीज प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नाची गांभीर्याने दखल ऊर्जा विभागाने घेतली. राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली.

या बैठकीत वीज समस्या बाबत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

आज पार पडलेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार व माजी मंत्री श्री. दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार महेंद्र दळवी, शेखर निकम, प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

फोटो : ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार निलेश राणे यांनी कोकणातील उपस्थित केलेल्या वीज समस्यांवर महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.