मोबाइल कॅन्सर निदान व्हॅन परुळें बाजार येथे शिबीर ला उस्फूर्त प्रतिसाद…

परुळे l प्रतिनिधी :कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरित उपचार मिळावेत या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन जिल्ह्यात दाखल झाली आहे. आज प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे अंतर्गत ग्रामपंचायत परुळेंबाजार, तालुका वेंगुर्ला येथे सकाळी ९ ते ४ या वेळेत संपन्न झाला. यावेळी उद्घाटन प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, माजी सभापती शिक्षण व आरोग्य निलेश सामंत, सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, अवधूत रेगे, योगेश शेट्टये, माजी सरपंच प्रदीप प्रभू, उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य सुनाद राऊळ यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्त्रीरोग तज्ञ डॉ. शेटकर दंत शल्य चिकित्सक डॉ. मणेर ,नर्सिंग स्टाफ उपलब्ध असून मुखाचा,स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदानासाठी तपासणी करण्यात येईल. तपासणीत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदानासाठी pap smear व VIA तपासणी ,मुखाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग निदान करण्यासाठी बायोप्सी घेण्यात येईल. निदान झालेल्या रुग्णांना शासनामार्फत डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचार केले जातील. उपस्थित रुग्णांचे रक्तदाब, ब्लड, शुगर,हिमोग्लोबिन तपासणी व आयुष्यमान कार्ड ,आभा कार्ड काढण्यात येणार आहे .तरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वेंगुर्ला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र लिलके व वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र परुळे डॉ. अश्विनी माईनकर डॉ.शलाका सावंत ,डॉ. सागर पवार तसेच कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत परुळेबाजार , कुशेवाडा, म्हापण, केळूस, कोचरा , निवती-मेढा, भोगवे, चिपी येथील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवर यांच्या हस्ते मोबाइल व्हॅन तपासणीला शुभारंभ करण्यात आला. शिबिरात मिळालेला चांगला प्रतिसाद