वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर व नगरपंचायतीचे आयोजन
वैभववाडी प्रतिनिधी
कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न होणार आहे. शुक्रवार दि. 23 जून रोजी सकाळी 11 वाजता येथील भाजपा कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी उपस्थित राहणार आहेत.
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावागावात भाजपातर्फे वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.
नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी तालुक्यात विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम राबविले आहेत. याहीवर्षी आमदार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नेहा माईणकर यांनी केले आहे.












