सावंतवाडी । प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त त्यांचे विचार तसेच त्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘हर घर मोदी’ या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडीत करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राजन तेली म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षे पूर्ण झाल्यान मोदी @ 9 हा उपक्रम देशभरात राबवीला जात आहे. मागील ९ वर्षांत पंतप्रधान मोदींनी केलेलं काम जनसामान्यांपर्यंत पोहचवल जाणार आहे. ‘हर घर चलो’ अभियानाचा सावंतवाडीतून आज शुभारंभ करण्यात आला आहे. अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ २७ जूनला करण्यात येणार आहे. तसेच इतर विविध विकासकाम सुरु केली जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, अनुसुचित जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक,माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, परिक्षीत मांजरेकर, दिलीप भालेकर, मधुकर देसाई आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Sindhudurg